काँग्रेस पक्ष कार्यालया मध्ये राजकीय भेळभत्ता कार्यक्रम

पुणे : पूर्वीच्या काळी निवडणुका म्हणले की प्रचारानंतर कार्यकर्त्यांचा भेळीच्या भत्त्यावर जोर असायचा १९८० पासून भेभत्ता कार्यक्रम काँग्रेस पार्टी मध्ये चालू आहे. आजपण काँग्रेस कार्यकर्ता ही भेळभत्ता विसरला नाहीये.

आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारून १ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त आज काँग्रेस भवन येथे भेभत्ता कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, माजी महापौर कमल व्यरवहारे, शिक्षण मंडळ माजी अध्यक्षा संगीता तिवारी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, सुजित यादव, गौरव बोराडे, द. स. पोळेकर, फिरोज शेख, ॲड. राहुल ढाले, सनी रणदिवे, गुलाम खान, दिपक ओव्हारण, नितीन वायदंडे, कुणाल चव्हा्ण आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी भेळभत्याचा आनंद घेतला.

सध्या बदलत्या काळानुसार प्रचाराचे साहित्य, मटण पार्टी, हॉटेलमधील पार्टी, डिजिटल प्रचार असे निवडणूकांचे स्वरूप बदलले आहे. कार्यकर्त्यांमधील बदल देखील अनेकदा नोंदवला जात असताना भेळभत्ता कार्यक्रमाची राजकीय परंपरा आज देखील आधुनिकतेत टिकून राहिली आहे.

See also  सुस मधील पेरिविंकल मध्ये थेट अयोध्येतील श्रीरामांच्या अमृत कलशा चे आगमन