आपले संविधान!आपला अभिमान!

प्रा. बालाजी हरीभाऊ मगर
आज संविधान दिन २६ नोव्हेंबर १९४९ ला आपल्या भारताची राज्यघटना लिहून पूर्ण झाली आणि त्याची अंमबजावणी ही २६ जानेवारी १९५० रोजी सुरू झाली. आणि खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता अमलात आली, म्हणुन आपण शाळा, महाविद्यालयात आपण या दिनानिमित्त प्रजासत्ताक दिन साजरा करतो, या घटनानिर्मिती साठी खूप भटकंती करावी लागली, म्हणजेच एकंदरीत ६० देशांच्या घटनेचा अभ्यास करुन भारताची राज्यघटना लिहिण्यात आली. दुसरी महत्त्वाची बाजु म्हणजे या घटना निर्मिती साठी २ वर्ष ११महिने १८ दिवस इतका कालावधी लागला. व आपल्या भारताला जगातील सर्वात मोठी राज्यघटना लाभली.

भारताच्या राज्यघटनेच्या वैशिष्टये याचा विचार केला असता तळागाळतील व्यक्ती पासून ते राष्ट्रपती व प्रधानमंत्री पदा पर्यंत सर्वांना न्याय देणारी घटना आहे. परुंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटना स्वीकृतीच्या वेळी त्यांनी काढलेले विधान सर्वात महत्वाचे ठरते, ते म्हणजे “संविधान कितीही चांगले असले तरी, त्यांला चालवणाऱ्या व्यक्ती जर खराब असतील तर संविधान शेवट पर्यंत चांगले राहू शकत नाही, व जर व्यक्ती चांगल्या असल्या तर संविधान शेवटपर्यंत चांगले ठरेल. असे उद्गार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढले. होते, त्या विधानाचा अमल चांगल्या पद्धतीने झाला. तर निशचितपणे भारताची राज्यघटना चांगलीं ठरेल. व आपले संविधान! आपला अभिमान! ठरेल. आपल्या भारताच्या संविधानाचा विचार केला असता, भारतीय संविधानातील मुलभूत हक्क कलम १२ ते ३५ मध्ये दिलेले आहेत, व कलम ३५ ते ५१ मुलभूत कर्तव्य दिलेली आहेत. या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे आपल्या संविधानाचा आदर करण्यासारखे आहे. आणि सगळ्यात मोठी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आपल्याला दिसून येते ती म्हणजे भारतीय संविधानानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कावरती गदा येत असेल तर प्रत्येक व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 नुसार दिलेला आहे म्हणजेच भारतीय संविधानातील कलम 32 नुसार आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो ही सगळ्यात मोठी तरतूद मूलभूत हक्क संबंधित केलेले आपल्याला दिसून येते म्हणून मला माझ्या भारतीय राज्यघटनेचा अभिमान वाटतो त्याचबरोबर कलम १४ कायद्यापुढे समानता भारतीय संविधानातील या कलमानुसार झोपडीत राहणारा गरीब व देशाचा राष्ट्रपती हा कायद्यासमोर समान असतो. म्हणजेच कायदा हा सर्वांसाठी समान भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला आहे तसे पाहायला गेले तर कायद्याच्या बाजूचा विचार केला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निराप्राराध व्यक्तिला सजा झाली नाही पाहिजे. अशा पद्धतीचे संविधान आपल्या भारत देशाला लाभले आहे म्हणून मला माझ्या भारतीय संविधानाचा अभिमान वाटतो. आदर वाटतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानातील कलम १५ या कलमावर ती “आर्टिकल फिफ्टीन” असा एक मध्यंतरी चित्रपट सुद्धा आला, म्हणजेच एका कलमावरती एक चित्रपट बनू शकतो. यातूनच आपल्या भारतीय राज्यघटनेची व्यापकता आपल्याला जाणवते आणि विशेष करून कलम १५ चां विचार केला असता धर्म ,वंश, जात ,लिंग,भेद या कुठल्याही कारणावरून व्यक्तीला पदावरून दूर केले असता, संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो. व ती व्यक्ती गुन्ह्यास पात्र ठरते. अशा पद्धतीची तरतूद भारतीय संविधानातील या कलमांमध्ये केलेले दिसून येते, म्हणून भारताची राज्यघटना ही एक सामाजिकभान जपणारी राज्यघटना आहे.

See also  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यातील पहील्या सचिवालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न;खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

खऱ्या अर्थाने विचार केला असता आपल्या भारतीय संविधानाकडे लोकशाही शासन प्रणाली म्हणून बघितलं गेलं आहे. त्या व्यतिरिक्त लोकशाही समाज प्रणाली म्हणून या भारतीय संविधानाकडे बघितले गेले पाहिजे,. तरच आपल्या संविधानाचा आदर ठेवण्यासारखे आहे. आपल्या मूळ संविधानाचा विचार केला असता, या मुळ भारतीय राज्यघटनेमध्ये सुरवातीला ३९५ कलमे,८ परिशिष्ट, २२ विभाग होते. या सर्व कलमांचा विचार केला असता, भारताची राज्यघटना ही विस्तृत राज्यघटना असल्याचे जाणवते.
त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे २० व्या भागात कलम ३६८ मध्ये दिलेली घटना दुरुस्तीची पद्धत त्यामूळे भारतीय संविधानात आपल्याला दुरूस्ती करता येते. परंतू घटना बदलता येतं नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे न्यामंडळाचे स्वातंत्र्य. या न्यामंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आर्थिक प्रलोभनाला न्यायलाय बळी पडू नये, म्हणून त्यांच्या सेवा, शर्ती,वेतन, भत्ता ,घटनेने ठरवून दिलेले आहे, जेणेकरून न्यायालय आर्थिक प्रलोबनाला बळी पडू नये, व योग्य व्यक्तीला योग्य व लवकरात लवकर न्याय मिळावा अशी तरतूद घटनेत केली आहे, म्हणुन भारताचे संविधान हे आदर्श संविधान ठरते, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन या न्यायालयीन पुनर्विलोकनाचा विचार केला असता न्यायालयीन पुनर्विलोकन असे सांगते की कायदेमंडळाचा कायदा किंवा शासनाचा आदेश हा घटनेची विसंगत आहे की सुसंगत आहे याची तपासणी करण्याचा अधिकार जर तो विसंगत असेल तर त्याला रद्दबातर ठरवण्याचा अधिकार म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन होय अशा पद्धतीची तरतूद कायदेमंडळाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी केलेली आपल्याला दिसून येते. भारतीय संविधानाची दुसरे महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे धर्मनिरपेक्षता या धर्मनिरपेक्षते मध्ये भारतातील विविधतेतील एकता जपण्याचा प्रयत्न या धर्मनिरपेक्षता या अटीमुळे होतो म्हणजेच भारतात वेगवेगळ्या पद्धतीचे धर्म आहेत तरीसुद्धा विविधतेत एकता दिसून येते म्हणून आपल्या भारतीय संविधानाचा अभिमान आपणास वाटतो. आणि लोकशाही शासन प्रणाली चां विचार केला असता, यामध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही असा आपल्या लोकशाहीचा उपयोग संपूर्ण भारतामध्ये होतो त्यामुळे संपूर्ण जगातील इतर घटनेपेक्षा आपल्या भारताची राज्यघटना महत्वाची ठरते कारण या घटनेमध्ये कलम १९ नुसार बोलण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. म्हणुन आपल्या भारतीय संविधानाचा अभिमान वाटतो. आपल्या भारतीय संविधानाचा वापर खेड्यातील पारापासुन भारतातील राजकीय वर्तुळापर्यंत आपल्याला दिसून येतो. या व्यवस्थेला व्यवस्थित करण्याचे योगदान या संविधानाचे कायमस्वरूपी आपल्याला लाभले आहे. म्हणुन मला भारतीय संविधानाचा अभिमान, आदर, वाटतो. या सर्व बाबी विचारात घेता एक भारताचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणुन आपण आपल्या भारतीय संविधानाचा आदर करावा.
प्रा. मगर बालाजी हरीभाऊ
मो.नं. ९३२२९८८७९३
इतिहास विभाग. बाबुरावजी घोलप कॉलेज सांगवी,पुणे.