पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त आरोग्य उपक्रमासाठी संजय बालवडकर यांनी धनादेश सुपूर्द केला

बाणेर : देशी गाईचे तूप व आरोग्य उपक्रमासाठी धनादेश देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नंदिनी गो-शाळेचे गोसेवक संजय(आप्पा) बालवडकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व भेटवस्तू न देता गरीब रुग्णांना मदत कार्यासाठी पुष्पगुच्छ व भेटवस्तूचे पैसे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत समाजातील विविध स्तरातून नागरिकांनी मदत सुपूर्द केली. बालेवाडी येथील नंदिनी गो – शाळेच्या वतीने संजय बालवडकर यांनी शुभेच्छा पर मदतीचा धनादेश यावेळी सुपूर्द केला.

See also  महिलांच्या हाती भगवा ध्वज देऊन दुर्गादौडला बाणेर मध्ये सुरुवात