पुनर्वसनानंतरही समस्यांचा डोंगर; आंबिल ओढा रहिवाशांचे SRA अधिकाऱ्यांना निवेदन

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आंबिल ओढा परिसरातील रहिवाशांना राजेंद्र नगर, प्रयेजा सिटी आणि लेकटाऊन (बिबवेवाडी) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, सध्या या पुनर्वसित नागरिकांना विविध मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
ज्या इमारतींमध्ये हे रहिवासी राहात आहेत, त्या ठिकाणी लिफ्ट वारंवार बंद पडणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न उचलणे, पिण्याच्या पाण्याचा असमान पुरवठा, जिना व पार्किंग परिसरातील दिवे न लागणे अशा विविध अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर बुधवारी पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीशकुमार खडके यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये सर्व समस्यांचा उल्लेख करण्यात आला असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अधिकाऱ्यांना सर्व समस्या समजावून सांगण्यात आल्या. संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी खडके यांनी दिले.

या वेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, श्री. चंद्रकांत जावडेकर, श्री. आप्पासाहेब घनवट, श्री. सचिन दिघे, श्री. बालाजी लोकरे, श्री. सागर पवार, श्री. बाळासाहेब सोनवणे, श्री. राम कदम, श्री. बाळू खंडागळे आणि श्री. कमलेश माने उपस्थित होते.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण