सहयोग फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून वारीमध्ये दिली जाणार आरोग्य सेवा

कोथरूड : कोथरूड येथे सहयोग फाउंडेशन, निगडी. कोथरूड डॉक्टर फोरम, कोकणवासीय महासंघ पुणे शहर व मा. नगरसेविका सौ. अश्विनीताई तुकाराम जाधव यांच्या सहयोगाने वारी दरम्यान वारकऱ्यांना निरपेक्ष वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.

वारी दरम्यान 2010 पासून निरपेक्ष भावनेने ही सेवा दिली जात आहे . वारीमध्ये दररोज पाचशे ते हजार भाविकांना आरोग्य फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. साई क्लिनिक कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वारीतील आरोग्य विषयक उपक्रमासाठी लागणारी औषधे सहयोग फाउंडेशन कडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी सहयोग फाउंडेशनचे डॉ. गोपाळ पवळे, उल्हास तापकीर, अशोक वाळके, बबन जाधव, कोकणवासीय महासंघ पुणे शहर अध्यक्ष तुकाराम जाधव तसेच मा. नगरसेविका सौ. अश्विनीताई तुकाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुषार जाधव, कोथरूड फॉर्मचे डॉ. संजय बुटाला, डॉ. संदीप बुटाला, डॉ महेश वायाळ, डॉ. शुभदा जोशी, डॉ. सुनील भुजबळ, डॉ. गायत्री वहाळकर, डॉ. योगेश भागवत आदी उपस्थित होते.

See also  नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे-उद्योगमंत्री उदय सामंत