पुणे : विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान ३५ वा राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह सालाबाद प्रमाणे यावर्षीही उत्साहात पार पडला.
रोड अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी कंपनीने विविध उपक्रमातून सर्व स्तरावरील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभाग वाकड , निगडी व सांगवी यांच्या सहकार्याने कंपनीचे अधिकारी व स्टाफ यांच्या समवेत सप्ताहात भूमकर चौक व बालेवाडी (राधा चौक), रावेत (लंडन ब्रिज), औंध रोड (रक्षक चौक) या ठिकाणी सुरक्षित वाहने चालवणाऱ्या चालकास पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच असुरक्षित वाहन चालणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचे वाढते प्रमाण व त्यामुळे होणारे स्वतःचे व कुटुंबाचे नुकसान याविषयी जनजागृती करण्यात आली. ही जनजागृती करत असताना पोलीस अधिकारी व कंपनीतील अधिकारी यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
या सडक सुरक्षा सप्ताह अभियानामध्ये पोलीस निरीक्षक श्री पिंजन साहेब, उपनिरीक्षक अंबोरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख साहेब वाकड वाहतूक विभाग तसेच पोलीस उपनिरीक्षक सुनील डिमोले साहेब निगडी वाहतूक विभाग व पोलीस निरीक्षक श्री गोकुळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळी साहेब सांगवी वाहतूक विभाग तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस उपनिरीक्षक आर आर पाटील( बालेवाडी पोलीस चौकी) चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन व पोलीस स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाव्यतिरिक्त कंपनीच्या अन्य ठिकाणी चालू असणाऱ्या बांधकाम साइट व परिसरामध्ये रोड सुरक्षा जनजागृती रॅली, सडक सुरक्षा अभियान अंतर्गत प्रशिक्षण, वाहनांचे पीयूसी चेक अप कॅम्प, रोड सुरक्षा चित्रकला स्पर्धा इत्यादी विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.