बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद चाकणकर यांचे निधन

बाणेर : बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद चाकणकर (वय-४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे आई,भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाचे असा परिवार आहे.


बाणेर परिसरामध्ये विविध सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. बाणेर येथील श्री खंडोबा मंदिराचे उभारणी त्यांनी केली होती. तसेच बाणेर परिसरातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका देखील त्यांनी सुरू केली होती.
सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी बाणेर परिसरामध्ये उल्लेखनीय कार्य केले होते.

See also  शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखपदी प्रकाश भेगडे व  जिल्हा समन्वयक पदी भानुदास पानसरे यांची निवड झाल्याबद्दल महाळुंगे बाणेर बालेवाडी सुस प्रभागाच्या वतीने सत्कार