कर्वे रोडवरील वाहनाच्या पार्किंगसाठी अशी व्यवस्था असणार

पुणे, दि. १९: पुणे शहरातील कर्वे रोडवरील मेट्रोचे काम पूर्ण झाले असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध होत आहे अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखा पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.

रसशाळा चौकाकडून स्वातंत्र्य चौकाकडे जाताना:
बँक ऑफ महाराष्ट्र समोर १० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे. भाग्यश्री ज्वेलर्स ते चैतन्य नगरी सोसायटी येथे १५ मीटर चारचाकी पार्किंग आणि युनियन बँक ते स्वप्न नगरी सोसायटी येथे २० मीटर चारचाकी पार्किंगची सोय करण्यात येत आहे.

सिद्धेश्वर मेडीकल ते कोहीनूर वाईन्स पर्यंत सोसायटी गेट सोडून तसेच गणेश चेंबर, रेबन शोरुम ते अमर हार्ड वेअर पर्यंत १५ मीटर दुचाकी पार्कींग करण्यात येत आहे.

स्वातंत्र्य चौक ते रसशाळा चौकाकडे जाताना:
कल्याण ज्वेलर्स शेजारील धनश्री ग्लास दुकान ते गो-कलर्स दुकान पर्यंत ५ मीटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे. जगन्नाथ तरटे मार्गाशेजारील ओपन हाऊस, सारथी हॉटेल ते प्राईम फर्निचर शोरुम पर्यंत ५० मीटर दुचाकी पार्किंग तर भोडे कॉलनी लेन ते कचरे पथ पर्यत २० मिटर दुचाकी पार्किंग करण्यात येत आहे.

वाहनचालकांनी पार्किंगच्या बदलाची नोंद घेवून आपली वाहने पार्किंग करावीत, असे आवाहनही वाहतुक शाखा, पुणे शहर यांच्या मार्फत केले आहे.

See also  मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ; सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे - खासदार अॅड. वंदना चव्हाण