बाणेर येथे शिवसेनेच्या रमजान ईद सरंजाम वाटपाच्या कार्यक्रमात सचिन अहिर म्हणाले, आमचे हिंदुत्व मनमे राम और बदल मे छूरी असे नाही

पुणे : आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संविधान वाचवण्यासाठी लढाई लढत आहेत.मातोश्री ज्याप्रमाणे आमच्यासाठी मंदिर आहे त्याप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी ही आहे असे म्हणत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम शिवसैनिकांना मातोश्री मध्ये नमाज पडायला सांगितली होती. आमचं हिंदुत्व हे मन मे राम बगल मे छुरी असे नाही. आमच हिंदुत्व मन मे राम और हातो को काम आहे. हिंदुत्वाची भूमिका घेत असताना दुसऱ्या समाजातील द्वेष भावांना आम्ही कधीही निर्माण केली नाही असे शिवसेना संपर्क नेते आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील (संस्थापक/ अध्यक्ष बाणेर नागरी सहकारी पत संस्था मर्यादित बाणेर) यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद सरंजाम वाटप तसेच पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या संमती बालनिकेतन आनंदाश्रमास 51 हजार रुपये मदत तसेच मुळशी तालुका अपंग कल्याण संस्थेचे 51 हजार रुपये मदत आणि गरवारे कंपनीतील कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना न्यायालयीन लढ्यासाठी 51 हजार रुपयाची मदत या निमित्त करण्यात आली. तसेच वसुंधरा अभियान बाणेर यांना राज्य सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि पत्रकार केदार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या पुणे बुलेटिन वेब पोर्टलला व महाळुंगे गावची कन्या प्रिया पाडाळे हिने स्टुडंट्स ऑलिंपिक नॅशनल गेम्स मध्ये 200 मीटर रेस मध्ये सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रमूख अतिथी ममता सिंधुताई सपकाळ, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, मौलाना ज. मोहम्मद जफर कासमी, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, ॲड. लीना मुरकुटे, युगंधरा मुरकुटे, गणपत मुरकुटे, ॲड. पांडुरंग थोरवे, समाजसेवक मारुती चांदेरे, राहूल बालवडकर, राजेश विधाते, राजू शेडगे, प्रकाश बालवडकर (शेतकरी संघटना), डॉ. सागर बालवडकर, जीवन चाकणकर, अर्जुन शिंदे, ॲड. दिलीप शेलार, नाना वाळके, मयूर भांडे, आनंदा कांबळे, विजय विधाते, जंगल रणवरे, संजय ताम्हाणे, अर्जुन ननावरे, नामदेव गोलांडे, ऋषभ मुरकुटे, सतीश रणवरे, रामदास विधाते, नवनाथ मुरकुटे, विकास भेगडे, राम गायकवाड, बाळासाहेब भांडे, संतोष मोहोळ, किसन सुतार, संतोष तोंडे, किरण मुरकुटे, वसंत चांदेरे, शब्बीर सय्यद शेख, संतोष भोसले, महबूब शेख, सैपन शेख, सलीम सुतार, आयुब शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन शबाना पठाण, फातिमा शेख, अरीफा शेख, रुकसाना सुतार, बीबीजान शेख, बियामा बगानुर, शालनबी शेख यांनी केले.

See also  वायरलेस कॉलनी औंध , नवीन पावसाळी लाईन विकसित करण्याच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी

यावेळी प्रास्ताविक करताना डॉक्टर दिलीप मुरकुटे म्हणाले , शिवसेनेवरती कितीही संकटे आली तरी शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभी आहे. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर हे दिवस रात्र शिवसेना वाढीसाठी कष्ट घेत आहेत. त्यांच्या खंबीर पाठिंबामुळे आज कार्यकर्ता भक्कमपणे उभा आहे. अशा आमच्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवत परिसरामधील मुस्लिम बांधवांसाठी रमजान सरंजाम वाटप करत आहे. इतर सेवाभावी संस्थेला मदत देखील करत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच भक्कमपणे उभी राहिली आहे व राहील अशी ग्वाही या निमित्त देत आहे.

 आमदार सचिन अहिर  म्हणाले, जेंव्हा जेंव्हा संकट आली तेंव्हा तेंव्हा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे शिवसेनेला नेहमीच बळ मिळत आहे. डॉ. दिलीप मुरकुटे यांनी एक शिवसैनिक म्हणून नेहमीच समाजाला उपयोगी असे उपक्रम राबविले.  नेहमीच वंचित राहणाऱ्या मुस्लिम समाजाला रमजान ईदच्या निमित्ताने सरंजाम वाटप करून त्यांच्या आनंदात भर पाडली. शिवसेनेने नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करून सर्व धर्म समभाव जपत सर्वांना मदत करण्याचे काम करत आहे. त्याचीच प्रचिती आज डॉ. दिलीप मुरकुटे यांनी राबवलेल्या कार्यक्रमातून येत आहे.

यावेळी बाणेर, बालेवाडी ,सुस ,महाळुंगे ,पाषाण परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.