आम आदमी पार्टीचे राज्यभर आंदोलन
आरटीई रकमेची १८०० कोटी ची परिपूर्ती तातडीने करा.

पुणे : मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे असे सांगत आज आम आदमी पार्टीने पुणे तसेच नाशिक, नागपुर, सोलापूर, बीड, अहमदनगर, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर, धाराशीव, नांदेड, भंडारा, पालघर, रायगड अश्या अनेक ठिकाणी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात , परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब , वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही असे सांगत हात वर करीत आहे, त्यामुळे आज राज्यभर निदर्शने करीत निवेदने देण्यात आली ‘ असे आप चे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी सांगितले. या निमित्ताने शिक्षण व्यवस्था हा राजकीय अग्रक्रम मानणार्‍या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील लाखो गरीब पालकांच्या प्रश्नाला हात घातला आहे.

महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २३-२४ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शासनाकडून गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे असा आरोप यावेळेस मुकुंद किर्दत यांनी केला.

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होते आहे. शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला.

See also  NCL पूर्वप्राथमिक व प्राथमिक  विभागाकडून आषाढी पालखी सोहळा उत्साहात साजरा