पाषाण येथील गौरव रामदास दातार यांचे निधन

पुणे: गौरव रामदास दातार (वय १९,रा. पाषाण) याचे अपघाती निधन झाले. गुरुवार(२२ जून) दुचाकीवरून तोरणा किल्ल्याकडे जाताना नसरापूरगावाच्या हद्दीत त्याची दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला होता.

उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना, २६ जून रोजी त्याची प्राणज्योत मालवली.गौरव हा मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे बी. कॉम द्वितीय
वर्षात शिक्षण घेत होता. घरातील सर्व वारकरी असल्याने त्याला कीर्तनाचा छंद होता.ज्येष्ठ मृदंग वादक पांडुरंग दातार महाराज
यांच्याकडे मृदंगाचे शिक्षण घेत होता.त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.पत्रकार रामदास दातार यांचा तो
मुलगा होत.

See also  आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन