बालेवाडी : बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठानचे ज्ञानसागर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चतु: शृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत बाणेर बालेवाडी पोलीस चौकी चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्री रुपेश टेमगिरे, पोलीस नाईक श्री गणेश चौधर आणि पोलीस अंमलदार श्री नितीन चोखर यांनी २६ जून जागतिक व्यसनमुक्ती दिनाबाबत आम्ली पदार्थविरोधी विविध शाळा – महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती सप्ताह व निर्भय विदयार्थी अभियान राबवले आहे.
याचाच एक भाग म्हणून चतु: शृंगी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी डीआयएमआर च्या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले.व कोणतेही व्यसन न करण्याची शपथ दिली .
यावेळी डीआयएमआर चे संचालक डॉ साजिद अल्वी यांनी विदयार्थ्यांनी निर्व्यसनी राहून चांगला अभ्यास करून उत्तम करियर घडवावे असे मार्गदर्शन केले . या उपक्रमाचे कौतुक एसकेपी चे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर व सचिव डॉ. सागर बालवाडकर यांनी करून सर्वाना कुठल्याही व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले . या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शामली जोशी यांनी केले तर सर्वांचे आभार ग्रंथपाल श्री सुनील कांबळे यांनी मानले.