दलित पँथर” ५१ व्या वर्धापन दिना निमित्त “युवाशक्ती संघटनेचा” गौरव

पुणे : “दलित पँथर” ५१ व्या वर्धापन दिना निमित्त सुवर्ण-महोत्सवी ५१ वर्षांचे अवचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात “युवाशक्ती संघटनेला” समाजहीत जपणारी व उल्लेखनीय शैक्षणीक कामगिरी करणारी संघटना म्हणून दलित पँथर संघटनेच्या वतीने जाहीर गौरव सन्मान करण्यात आला.

यावेळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष रोहित आगळे यांनी संगीतले की गेल्या तीन वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करत आहोत. समाजाने आमची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. दलित पँथरचे अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा स्नेहाताई माने, आमदार सुनील कांबळे, युवानेते विशाल ओव्हाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

See also  आंतर जिल्हा घरफोडीचे गुन्हे करणा-या अट्टल ०३ आरोपींना खड़की पोलीसांनी २४ तासात केले जेरबंद