मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० बाबत शेतकरी खातेदारांना आवाहन

पुणे : भोर-वेल्हा उपविभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० साठी भाडेतत्वावर जमीन देण्यासाठी पात्र व इच्छुक शेतकरी खातेदार व जमीन धारकांनी पुढील दोन दिवसांत संपर्क अधिकाऱ्यांशी आवश्यक माहितीसह संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० करिता वेल्हा तालुक्यातील पाबे, आणि भोर तालुक्यातील कामथडी, खानापूर आणि निगुडघर या सब स्टेशनच्या पाच कि.मी. च्या परिघातील कमीत कमी तीन एकर सलग असलेली खाजगी जमीन महावितरण कंपनीस भाडे तत्वावर हवी आहे. त्याबदल्यात प्रती एकर प्रती वर्ष ५० हजार रुपये अथवा प्रती हेक्टरी प्रती वर्ष १ लाख २५ हजार रुपये इतके वार्षिक भाडे सदर कंपनी देणार असून यामध्ये प्रती वर्ष ३ टक्के इतकी वाढ कंपनीकडून देण्यात येणार आहे.

इच्छुक शेतकऱ्यांनी पाबे आणि कामथडी सबस्टेशनसाठी महावितरणचे नसरापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे (मो.क्र.७८७५७६७७०६ ), तर खानापूर आणि निगुडघर सबस्टेशनसाठी भोर उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत (मो.क्र. ७८७५७६८२२५) या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी कळविले आहे.

See also  राज्यात प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहापालिका आणि सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचे लोकार्पण