जेजुरी येथे खंडेरायाचा सोमवती सोहळा सोमवारी

पुणे : अवघ्या महराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवती सोहळा सोमवार दिनाक
१७/०७/२०२३ रोजी संपन्न होणार आहे.

सोमवार दिनाक १७/०७/२०२३ रोजी दुपारी १ वाजता श्रींची पालखी प्रस्थान होणार असून महाद्वार पायरी मार्गाने नंदी चौक, छत्री मंदिर, जानुबाई मंदिर, धालेवाडी रोड मार्गे कर्हा नदी वर उत्सव मूर्तीना स्नान सोहळा संपन्न होणार आहे.
तसेच परतीच्या मार्गाने धालेवाडी गाव, कोरपड मळा, विद्यानगर मार्गे जानुबाई मंदिर येथे विसावा साठी थांबेल. साधारण रात्री ९ च्या सुमारास दक्षिणमुखी मारुती मंदिर, महाद्वार पेठेतून पायरी मार्गाने गडावर पोहचेल व देव बसल्यानंतर रोजमारा वाटप होऊन उपस्थितांचे भोजन झालेनंतर
सोहळ्याची सांगता होईल.
श्री मार्तंड देसंस्थान द्वारा सोमवती सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर व गडकोटास विद्युत रोषणाई,
गाभाऱ्याला फुलांची सजावट, जेजुरी ते धालेवाडी (कऱ्हा नदी स्नान) कर्हा नदी ते जेजुरी हा संपूर्ण पालखी मार्गाची साफसफाई व डागडुजी, रेल्वे क्रोसिंग शेजारी साधारण ४००० सर्वधर्मिय भाविक भक्तासाठी चहा, पाणी व प्रसादाची व्यवस्था, मंडप व्यवस्था व लाईट व्यवस्थेचे नियोजन करण्यातआलेले आहे.
उपरोक्त माहिती देवसंस्थान चे सन्माननीय प्रमुख विश्वस्त पोपट सदाशिव खोमणे, विश्वस्त अभिजित अरविंद देवकाते, विश्वस्त डॉ. राजेंद्र बबन खेडेकर, विश्वस्त मा. मंगेश अशोक घोणे,विश्वस्त अँड विश्वास गोविंद पानसे, विश्वस्त मा. अनिल रावसाहेब सौंदडे, विश्वस्त अँड पांडुरंग ज्योतिबा थोरवे, मुख्याधिकारी मा. राजेंद्र माणिकराव जगताप यांनी दिली.

See also  सहयोग फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून वारीमध्ये दिली जाणार आरोग्य सेवा