जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांच्या मुलांचा गौरव

मुळशी : मुळशीमधे जिल्हा बॅंकेच्या माध्यमातुन शेतकरी सभासदांच्या मुलांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केली आहे. जिल्हा बॅंक मुला मुलींच्या शिक्षणासाठी फक्त ६ टक्के दराने चाळीस लाखापर्यंत कर्ज बॅंक देत आहे. सचिवांसाठी दिड लाखांहुन पाच लाख कॅश क्रेडीट लोन मर्यादा वाढवली आहे. कामगारांचे प्रमोशन केले आहे. ही सर्व कामे केल्यानेच बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन पेरीविंकल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी पौड येथे केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बांदल बोलत होते.
पुणे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
राजेंद्र बांदल पुढे म्हणाले की आज महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणविस यांचा वाढदिवस आहे. एकाच दिवशी , एकाच राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस एकाच दिवशी येण्याचा योग उभ्या भारतात पहिल्यांदाच जमुन येत आहे. जिल्हा बॅंकेत त्यानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार घेतल्याबद्दल चांदेरेंना धन्यवाद देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले .यावेळी खूप मोठ्या संखेने तालुक्यातुन विद्यार्थी व पालक वर्ग सहभागी झालेला होता.
यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे पेरीविंकल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, बॅंकेचे कार्यलक्षी संचालक अंकुश उभे , राष्ट्रवादी कॅाग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे, नियोजन समितीचे मा. सदस्य अमित कंधारे , माजी सभापती कोमल वाशिवले , माजी सभापती उज्वला पिंगळे , पी. एम. आर. डी. ए. सदस्य सुखदेव तापकीर ,कृषी उत्पंन्न बाजार समिती संचालक राम गायकवाड , जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन आमराळे. विनोद कंधारे , जेष्ठ नेते विठ्ठल पडवळ, माऊली कांबळे, सुनील वाडकर, विजय येनपुरे, जितेंद्र इंगवले, बाबाजी शेळके , आनंदा घोगरे,मा. सरपंच महादेव गोळे, राजु पवळे , जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सणस, दिण्डी चालक भिलारे महाराज, बाळासाहेब उभे ,श्रीकांत तापकीर , लक्ष्मण निकटे विविध गावचे सरपंच, विकास सोसायटी चेअरमन , व्हा . चेअरमन , संचालक , सोसायटी सचिव व शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी सुनील चांदेरे , मा. राजेंद्र बांदल , मा. राम गायकवाड , मा. माऊली कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सागर आखाडे यांनी सुत्रसंचालन केले व वसुली अधिकारी राजेंद्र मारणे यांनी आभार मानले.

See also  नैतिकतेच्या आधारावर शिंदे फडणवीस सरकारने त्वरित राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी