मणिपूर मध्ये झालेली घटनांच्या निषेधार्थ बीएसएनएल ऑफिस मध्ये बी.एस.एन. एल. एम्प्लाईज युनियन, आणि बी.एस.एन.एल. वर्कींग वुमैन को-आर्डीनैशन कमिटी आणि आल इंडिया बी.एस.एन.एल.DOT पेन्शनर्सर असोसिएशन निदर्शने.

पुणे : बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, बीएसएनएल वर्किंग वुमन को-ऑर्डिनेशन कमिटी आणि ऑल इंडिया बीएसएनएल DOT पेन्शनर असोसिएशन तर्फे संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टी मध्ये 1.30 ते 2.00 या दरम्यान मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने करण्यात आले.

यावेळी मनीपुर येथे महिलांवर होत असलेल्या अन्यायाचा व मनीपुर येथे होत असलेल्या जातीय दंगली विषयी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी महिलांनी सुरक्षे बाबत चिंता व्यक्त केली व यापुढे सरकार वर भरोसा ठेवण्यात काही उपयोग नाही यापुढे महिलांना स्वतः ची सुरक्षा स्वतः करावी लागेल अशा भावना व्यक्त केल्या तसेच सर्व महिला हातात काठी घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या व मनीपुर सरकार तात्काळ बरखास्त करावे व या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

यावेळी कॉम्रेड एम आय जकाती, कॉ. विकास कदम, कॉ. मंजुषा लचके, कॉ.शामा गांधी कॉ.शैलजा ताकवले , यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन कॉ.संदीप गुळूंजकर यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.श्रीकांत यादव यांनी केले. यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते यामधे महिला कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

See also  उद्योगसंस्थांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे-मिनाज मुल्ला