वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन

कोथरूड :स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट यांच्या खासदार विकास निधीतून तसेच माझी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या प्रयत्नातून वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन काल शहराध्यक्ष  धीरजभाऊ घाटे, खडकवासला आमदार  भीमराव तापकीर व श्रीमती गिरीजा गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाला अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णवाहिकांची गरज प्रकर्षाने भासली. हीच गरज ओळखून जनतेच्या सोयीसाठी व आपत्तीजनक प्रसंगात मदत व्हावी हा दृष्टिकोन ठेवत वारजे कर्वेनगर भागासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.

या रुग्णवाहिकेला महानगरपालिकेच्या व्हेइकल डेपोच्या माध्यमातून २ ड्रायव्हर २४ तास उपलब्ध असल्याने, पुणे महानगरपालिका हद्दीमधील कोणत्याही ठिकाणी ही ॲम्बुलन्स सेवा मोफत दिली जाणार आहे. दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे असणारे स्वप्न आज रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पूर्ण झाले.

या कार्यक्रमाच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून कोथरूड तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये घेण्यात आलेल्या नमो चषक चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ देखील पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवजी मुरकुटे, सचिनजी बारड यांनी केले. तसेच बापूसाहेब मेंगडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. श्री. संदीप बुटाला, नगरसेवक श्री. सुशिलजी मेंगडे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. सचिनजी मोरे, श्री. गणेशजी वर्पे, मा. ज्येष्ठ नगरसेवक श्री. शिवरामभाऊ मेंगडे, श्री. किरणजी बारटक्के, स्वीकृत नगरसेवक श्री. बापूसाहेब मेंगडे, श्री. गणेशजी पासलकर, श्री. अरुणजी राजवाडे, श्री. अमितजी तोरडमल, श्री. शैलेशजी मेंगडे, श्री. हेमंतजी बोरकर, श्री. रामभाऊ बराटे, श्री. दत्तात्रयनाना बराटे, श्री. विजयजी फेंगसे, महिला अध्यक्ष सौ. मनिषाताई मोरे, सौ. रश्मीताई घुले, सौ. कल्पनाताई पुरंदरे, सौ. स्नेहलताई गायकवाड, श्री. दीपकजी पवार, श्री. माऊली चौधरी, श्री. महेशजी पवळे, श्री. अरुणजी साखळे, श्री. अरुणजी काळे, श्री. अनंत शिंदे, श्री. प्रफुल्ल सुभेदार, श्री. आदित्य बराटे, श्री. ओंकार चव्हाण, श्री. केदार मिटकरी, श्री. चंद्रकांत चौधरी, श्री. भोलाशेठ बराटे, श्री. हिंदूराव पाटील, श्री. सुनीलजी बाळगे, श्री. राजेशजी मनगिरे, श्री. नवनाथजी खांदवे, श्री. अमितजी सोनवणे, श्री. विठ्ठलजी पासलकर, श्री. गजानन जोशी, श्री. प्रकाश कुलकर्णी, श्री. होनपकाका, श्री. बाळकृष्ण खिस्ते, श्री. रवि टेमघरे, श्री. निलेश जाभळे, श्री. संतोषजी बराटे, श्री. अजिंक्य साळुंखे, श्री. रामचंद्र लोहिरे, पै. संदीप वांजळे, श्री. प्रशांत गाढवे, श्री. राजेंद्र सांगळे, योगेंद्र मोकाटे, प्रमोद पारखी, संकेत बोनगीर , नरेंद्र महाजन, ज्ञानेश्वर मोरे, अमित जोगावडे, ज्ञानेश्वर मारणे, गौरव खैरनार, अमोल शिंदे, किरण गोगावले, कुणाल तिकोणे, योगेश नवसकर, रामभाऊ शिंदे, भोजू  कुऱ्हाडे, श्री. हर्षल बराटे, श्री. ज्ञानेश्वर ठाकर, श्री. माधव देशपांडे, श्री. दिगंबरजी सप्रे, श्री. संकेत शितोळे, श्री. दत्ता माने, श्री. तुषार पांचाळ तसेच वारजे कर्वेनगर सोसायटी भागातील पदाधिकारी, स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे