कोथरूड : कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नामदार पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे. त्यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुस्थितीत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे इथल्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी यंदा लोकसहभागातून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे, यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.