पक्षांतरामुळे रंगत, शिवणे खडकवासला धायरी (पार्ट) या नव्याने समाविष्ट असलेल्या गावांचा प्रभाग क्रमांक 33 मधून उमेदवारी अर्ज दाखल

संदीप वाडेकर
खडकवासलाःमहानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्षांतरामुळे आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे.
शिवणे खडकवासला धायरी पार्ट या नव्याने समाविष्ट असलेल्या गावांचा प्रभाग क्रमांक 33 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून भाजप शिवसेनेतील दोन उमेदवारांना खेचून आणत  आपला स्वतंत्र पॅनेल तयार केला आहे. भाजप नाराज उमेदवार आणि निवडून येण्याची खात्री नसल्याने शिवसेनेतील उमेदवारांनी तुतारी फुंकली आहे. सुरुवातीपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून इच्छुक असलेल्या एका उमेदवाराला आपल्याकडे खेचण्यात त्यांनी यश मिळविले आहे.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून समाविष्ट गावांमध्ये मधील खडकवासला शिवने धायरी परिसरात कोणाला तिकीट मिळणार आणि कोण बाजी मारणार अशा चर्चा रंगत होत्या. भाजपमधून इच्छुकांची भली मोठी यादी होती तर ठाकरे गटाच्या उमेदवारांना नक्की आपण निवडून येणार का या शंकेने  ग्रासले असताना भाजपशी संधान असलेल्या पक्षाचे तिकीट मिळविण्यास व्यस्त होते.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची पळवा पळवी सुरू झाली. शिवणे खडकवासला धायरी पार्ट या प्रभाग क्रमांक 33 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून इच्छुक असलेले संदीप मते आणि बीजेपीतील नाराज उमेदवार रुपेश घुले यांनी एका रात्रीत पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊन फॉर्म भरला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तगडा झाला आहे. या पक्षात सुरुवातीपासूनच इच्छुक असलेले काका चव्हाण, अनिता इंगळे यांनी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार केल्यामुळे वातावरण तयार  झाले आहे. याच वातावरणात निवडून येण्याची खात्री असल्यामुळे संदीप मते आणि रुपेश घुले यांनी प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 33 खडकवासला धायरी शिवणे या भागामध्ये शरद पवार गटाचे नेहमीच राबवले राहिलेले आहे त्यामुळेच शिवसेनेतील उमेदवार आणि भाजपतील एक नाराज उमेदवार यांना एकत्र घेऊन इच्छुकांना एकत्र करत मोट बांधता आली. चारही उमेदवार समाजात कार्यरत असल्यामुळे निवडून येण्याची खात्री आहे.
– त्र्यिबक मोकाशी
अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस

See also  पुणेकरांच्या अपेक्षांना जबाबदारीने सामोरे जाऊ – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ