महापुरुषांच्या नावाने गरळ ओकणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई करा ,संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करून अटक करा अशी मागणी हडपसर मधील संघटनांनी केली.

हडपसर: महात्मा गांधी, महात्मा फुले या महापुरुषांच्या नावाने गरळ ओकून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या संभाजी भिडेवर शासन आणि प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून अटक केली पाहिजे, अशी मागणी हडपसर मधील सर्व संघटनांनी मागणी केली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर म्हणाले की, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याला त्वरित अटक करून त्याच्या वर कायदेशीर कार्यवाही करावी.
तर समाजवादीचे नेते प्रा. सुभाष वारे म्हणाले की, संभाजी भिडे नामक व्यक्ती महापुरुषांची बदनामीची वक्तव्य करीत आहे. प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, त्यामुळे त्यांची भीड चेपत चालली आहे. समाजामध्ये आक्रोश, संताप आहे, त्यामुळे भिडेंवर कारवाई करून अटक केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

हडपसरमधील सर्व पक्षीय आणि संघटनांच्या वतीने महापुरुषांची बदनामी करणाऱ्या संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावी, अशा मागणीचे निवेदन हडपसर पोलीस स्टेशनला देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,प्रा.सुभाष वारे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, सुनील बनकर, विठ्ठल सातव, मुकेश वाडकर , पांडुरंग माटे ,प्रशांत सुरसे, संजय शिंदे, नितीन आरू, महेंद्र बनकर, दीपक इसावे, सतीश आल्हाट, राजेंद्र नेवसे, शिवकुमनार मोळकरी, भागवत काळे, महेश ससाणे राजू शिंदे, सुभाष रायकर, प्रा. शोएब इनामदार, सविता बोराटे, साधना शिंदे, विवेक तुपे, शीतल शिंदे, मंगेश रायकर, उज्ज्वला जगताप, दीपाली माटे, आशाताई पाळेकर, वैष्णवी सातव , बिना कट्टमनी,विनोद ससाणे ,गणेश वाडकर,महेश बनकर, प्रितेश गवळी, पंढरीनाथ बनकर,संगीता बोराटे,सुधीर होले,संतोष कोद्रे,संतोष होले,विवेक तुपे, गणेश फुलारे,स्वप्नील डांगमाळी,महेश बनकर, सुधीर होले,गणेश ससाणे,संजय टिळेकर व इतर मान्यवर ही उपस्थित होते.

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके म्हणाले की, भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजाच्या भावना शासन दरबारी मांडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान वैष्णवी सातव,बिना कट्टमनी, गौरी पिंगळे, दीपाली माटे, सुनीता भगत, प्रा. विद्या होडे, रोहिणी भोसले म्हणाल्या की, संभाजी भिडे यांचा उल्लेख मनोहर भिडे असा करा, महापुरुष सर्व समाजाचे आहेत, त्यांची बदनामी सहन करणार नाही. संभाजी भिडेची गाढवावर बसवून चप्पलचा हार घालून पुण्यात धिंड काढली पाहिजे, अशा तीव्र भावना महिलांनी व्यक्त केला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महात्मा जोतीराव फुले समिती तर्फे करण्यात आले होते अशी माहिती समितीचे मुख्य समन्वयक मुकेश वाडकर यांनी दिली.

See also  महानगरपालिकेच्या विजेच्या खांबावर अनाधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे व आर्थिक स्वरूपाचा दंड करण्याची मागणी