“महाराष्ट्र शासनाच्या माथाडी व सुरक्षा कायदा बदलाच्या विधेयकाची होळी “

पुणे : पुणे शहर असंघटित कामगार कर्मचारी कांग्रेस व राष्ट्रीय मजदूर संघ यांच्या संयोजनाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालया जवळ महाराष्ट्र शासनाने माथाडी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या करीता पावसाळी अधिवेशनात कामगार कायदा बदलण्याचे विधेयक प्रस्तुत केले होते त्याच्या निषेधार्थ असंघटित कामगार कायदे बदलणेकरीता महाराष्ट्र शासनाने केलेल्या विधेयकाची (बिल) याची होळी करून कामगार कायदे बदलणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कांग्रेसचे अध्यक्ष श्री सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कांग्रेसचे सरचिटणीस राहुल वंजारी,, प्रदेश समन्वयक सौ. शीतल कोतवाल,पुणे शहर असंघटित कामगार कर्मचारी कांग्रेस शहर अध्यक्ष एस.पळसे,तसेच यासीन शेख, राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण आणि असंघटित कामगार कांग्रेसे आसिफ शेख, रवि ननावरे, दिपक ओव्हाळ,दत्ता शिंदे व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

See also  वेदांत अगरवालच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी