बालभारती ते पौडफाटा रस्त्यासंदर्भात सर्वंकष चर्चा

कोथरूड : पश्चिम पुण्याला सेनापती बापट रस्ता आणि डेक्कनकडून जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्यासंदर्भात नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. वाहतुकीला गती मिळणे, पर्यावरण जपणे, पुण्याची भविष्याची गरज आदी बाबींवर बैठकीत चर्चा केली.

नळ स्टॅाप येथे नव्याने साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी संपून लॉ कॅालेज रोडवरील वाहतुकीला गती मिळाली असली, तरी पुण्याच्या भविष्याचा आणि वाढणाऱ्या वाहनसंख्येचा विचार आपल्याला सर्वांनाच करावा लागणार आहे. पर्यावरणाच्या बाबतीत आपण सर्व गंभीर आहोतच. पण पर्यावरणासोबतच पायाभूत सुविधांची उपलब्धता हाही पुण्यासारख्या महानगरासाठी महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचे विचार ऐकून आणि सर्व बाबींचा विचार करुनच या प्रकल्पाबाबत पुढे जाण्याची भूमिका आहे.

यावेळी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बगाडे, नितीन आपटे, अभिजीत मोडक, रवी नातू, किशोर गोडबोले, बिरु खोमणे, मनोज आपटे तसेच लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड आणि प्रभात रोडचे नागरिक उपस्थित होते.

See also  सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला