सुतारवाडी पाषाण परिसरात सर्व पक्षांकडून एकत्र येऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली

सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण परिसरात सर्व पक्षांकडून एकत्र येऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
शिवननगर, सुतारवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्व पक्षीय पदाधिकारी (वंचित बहुजन आघाडी +शिवसेना (ठाकरे गट )+राष्ट्रवादी काँग्रेस +काँग्रेस+स्वाभिमानी शेतकरी संघटना ) या कार्यक्रमाला बाणेर -बालेवाडी -पाषाण -सुतारवाडी -सुस या भागातील प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमात सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमाला वक्ते म्हणून चिंतामण तात्या जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रामुख्याने रोहिणीताई चिमटे (माजी नगरसेविका राष्ट्रवादी ),
दत्ता भाऊ जाधव (सदस्य रेशनिंग कमिटी ),सतीशभाऊ रणवरे (संघटक वंचित ब. आघाडी पुणे शहर ), अशोक भाऊ दळवी मनसे नेते, मंगेशभाऊ निम्हण (सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस )ज्येष्ठ नागरिक मधुकर निम्हण,महादेव गोरखे, राहुल कोकाटे(भाजपा नेते ), उत्तम जाधव ,संतोष तोंडे (सुतारवाडी विभागप्रमुख शिवसेना ), संतोष लोंढे (महासचिव कोथरूड विधानसभा VBA), स्वातीताई रणपिसे विभाग संघटिका, सुनिता रानवडे शाखा संघटिका, सुरेखा शेळके शाखा संघटिका, रूपालीताई सुतार, कांबळे ताई,साहेबराव मंजुळकर (उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा VBA), नारायण जाधव, सुनील कसबे (संघटक कोथरूड विधानसभा VBA),समीर उत्तरकर(रा युवक सरचिटणीस पुणे शहर ,संतोष भाऊ गायकवाड रिपाई नेते,नकुल गोळे, दिनेश सुतार, अमोल फाले, प्रदीप दादा हुमे राष्ट्रवादी नेते,सामाजिक कार्यकर्ते मनीष चक्रनारायण, अनिल लोंढे, अण्णा नलावडे , तुषार आदमाने , आपल्या परिसरातील असंख्य महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते,व.

त्यावेळी प्रा. चिंतामण जाधव यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सांगली मधील वाटेगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास मांडला. कार्यक्रमाचे नियोजन महेशभाऊ सुतार (शिवसेना नेते), करण कांबळे सामाजिक कार्यकर्ते , राम चव्हाण ( उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा VBA), यांनी केले होते.

See also  आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन