सुस : सुस महाळुंगे हद्दीवरील बंटारा सांस्कृतिक भवन आणि तीर्थ टेक्नोस्पेस समोरील रस्त्यावर बंटारा भवनात कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांची व तीर्थ टेक्नोस्पेस मधील कर्मचाऱ्यांची वाहने मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूस अवैधरीत्या लावलेली असतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते.
सूस म्हाळुंगे हद्दीवरील सोसायटी मध्ये राहणाऱ्या या वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अपूर्ण रस्ते असून रस्त्याचे रुंदीकरण विकास आराखडा नुसार झालेले नाही. यामुळे अपुऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केले जात असल्याने रस्ता अरुंद होतो. या परिसरातील शाळा व कंपनी च्या वेळेत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
तसेच या परिसरामध्ये मान महाळुंगे हायटेक सिटी अंतर्गत टीपी स्कीम मंजूर असताना देखील पर्यायी रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. पर्यायाने नागरिकांना हा मार्ग सातत्याने वापरावा लागतो. परंतु या मार्गावर खाजगी कंपन्यांची वाहने तसेच भंडारा भवन येथील कार्यक्रमांची वाहने वारंवार लागत असल्याने हा रस्ता निम्म्याहून अधिक पार्किंगसाठीच वापरला जात आहे.
रस्त्यावर होणारी अनाधिकृत पार्किंग वर कारवाई करण्यासंदर्भात वारंवार वाहतूक पोलीस प्रशासनाला कळवून देखील कारवाई केली जात नाही.
बंटारा सांस्कृतिक भवन आणि तीर्थ टेक्नोस्पेस समोरील रस्त्यावर
होणाऱ्या अवैध पार्किंगवर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच या परिसरामध्ये वाहतूक नियोजनासाठी वार्डांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील सोसायटी यांचे नागरिक करीत आहेत.