तब्बल 60  उपाध्यक्षांसह पुणे शहराची राष्ट्रवादी पक्षाची (अजित पवार गट)जम्बो कार्यकारणी जाहीर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर
यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नविन पदाधिकाऱ्याना नियुक्ती पत्र देण्यात आली.
तब्बल ६० उपाध्यक्ष, १४ सरचिटणीस, २६ चिटणीस,४४ संघटक सचिव या कार्यकारणी मध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.

तर पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघ अध्यक्षपदी
हर्षवर्धन मानकर यांची, कार्याध्यक्ष नितिन कळमकर, खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष पदी प्रदीप उर्फ
बाबा धुमाळ, कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे, संतोष फरांदे, सागर भागवत, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी,पर्वती मतदारसंघ अध्यक्षपदी संतोष नांगरे, कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर, महेश कुंभार हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदी शंतनू जगदाळे कार्याध्यक्षपदी
संदीप बधे, अमर तुपे काँटोन्मेंट अध्यक्षपदी नरेश जाधव कार्याध्यक्षपदी राहुल तांबे कसबा विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी अजय दराडे कार्याध्यक्षपदी गोरखनाथ
भिकुले राहुल पायगुडे संतोष बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली.

युवक शहराध्यक्षपदी समीर चांदेरे, तर महिला अध्यक्षपदी प्रिया गदादे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

See also  विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ