नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला

नाशिक – जातीवादी पुन्हा एकदा संतापजनक वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी पुरोहितशाहीची मुजोरी मोडित काढूनदेखील पुरोहितशाही अजूनही छत्रपतींच्या घराण्याला शुद्र समजत असल्याची मानसिकता उघड्यावर आली आहे. त्याचा अनुभव खुद्द राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजस्नुषा संयोगिताराजे छत्रपती यांना आला. नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करु नका, अशा शब्दात संयोगिताराजे छत्रपती यांनी आपला संताप व्यक्त केला. रामनवमीच्या दिवशी संयोगिताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणोक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाजांच्या वंशजस्नुषा संयोगिताराजे छत्रपती यांनादेखील पुरोहितशाहीच्या मुजोरीचा अनुभव आला. संयोगिताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करत एकूणच घटनेवर टीका केली आहे. काल रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पूजा करताना महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशाप्रकारे पोस्ट करत संयोगिताराजे यांनी महंतांना खडसावले आहे.

काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा असे म्हणत आव्हाडांनी या प्रकारावर सडकून टीका केली आहे. तसेच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

वेदोक्त प्रकरण काय?
शाहू महाराज राजघराण्यातील धार्मिक परंपरेने कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी महिनाभर नियमितपणे जात असत. महाराजांच्या अंघोळ सुरू केल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला नारायण नावाचा भटजी ब्राह्मण पुरोहित काही मंत्र म्हणत असे. मात्र हा भटजी स्वतः आंघोळ न करताच मंत्र म्हणत होता. मंत्र म्हणताना पायातल्या चपलासुद्धा काढत नव्हता. जो मंत्र म्हणत होता तो काही वेदोक्त नव्हता तर पुराणोक्त होता. शाहू महाराजांनी त्याला विचारले की, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही? त्यावर तो म्हणाला शुद्रांसाठी पुराणोक्तच सांगावे लागते. शिवछत्रपतींच्या वंशजाला शुद्र म्हणून एक सामान्य भटजी संबोधत असल्याने महाराजांच्या मस्तकात आग पेटली. महाराजांनी त्या नारायण भटजीची तातडीने हाकालपट्टी करत राजवाड्यातील राजपुरोहितांनासुद्धा सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावीत असे सुनावले. यानंतर हे वेदोक्त प्रकरण प्रकरण फक्त करवीर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचले होते. परंतु, छत्रपतींचा आदेश आजही पाळला जात नसल्याचे कालच्या घटनेतून दिसून आले आहे.

See also  भाजपच्या आरोग्य शिबीरात १२हजार रुग्णांची मोफत तपासणी