बालेवाडी ममता चौक ते बालेवाडी वाकड पुलाकडे जाणाऱ्या 30 मीटर डीपी रस्त्याच्या कामाची पाहणी

बालेवाडी : बालेवाडी ममता चौक ते बालेवाडी-वाकड पुलाकडे जाणार्या ३० मी. डि.पी. रस्त्याच्या कामाची पाहणी स्मार्ट सिटीचे अभियंता व पुणे महापालिकेचे अधिकारी यांच्यासमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली. सदर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असुन माजी नगरसेवक अमोल बालवडकर,नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर तिन्ही भाजपच्या प्रतिनिधींनी या रस्त्याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.


या रस्त्यामध्ये टाकण्यात येणार्या ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन व पिण्याच्या पाईप लाईन बाबत आणि या रस्त्यात बाधित होत असलेल्या झाडांच्या प्रत्यारोपणाबाबत आढावा घेतला. तसेच सदर रस्त्याच्या कामामध्ये येणार्या अडथळ्यांबाबत सर्व अधिकार्यांसमवेत सविस्तर चर्चा केली.
यावेळी कुणाल एस्पायरी सोसायटी समोरील १८ मी. डि.पी.रस्त्याच्या कामाबाबत देखिल आढावा घेण्यात आला.
हा रस्ता कमीत कमी कालावधीत पुर्ण करुन बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच या रस्त्याच्या भुसंपादनाविषयी देखिल योग्य ती कारवाई केली जाईल. पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपा ला जोडणार्या पुलामुळे या परिसरातील लाखो नागरीकांना देखिल दळणवळणासाठी या रस्त्याचा अधिक फायदा होणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, शशिकांत बालवडकर, स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंन्ट कॅा.चे अभियंता अभिजित केवडकर, वीर पवार, ठेकेदार एम.बी.पाटील यांच्याकडुन मयुर कनके, अनिल आतकरे, पुणे मनपा ड्रेनेज विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता घोगरे, श्री.नांगरे उपस्थित होते.

See also  नियोजन विभागाकडून सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा ३८१ कोटींचा शासन निर्णय जारी