पाषाण : नवचैतन्य हास्य परिवार पाषाण येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापक, शिक्षक, योग शिक्षक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
आत्माराम जाधव, प्रमोद जहागिरदार, विजय कुलकर्णी, अशोक दळवी आदींनी शिक्षकां विषयी आदर व्यक्त केला . शाखाप्रमुख प्रतिभा त्रिमादे,उप शाखाप्रमुख वासंती यलवंडे ,एकनाथ शेवाळे ,बेबीताई वले ,मधुकर यलवंडे,अशोक सूर्यवंशी, बासावार साहेब, सुदाम भोसले उपस्थित होते. उत्तम कदम यांनी सूत्रसंचालन केले.आभार वासंती येलवंडे यांनी मानले.
नवचैतन्य हास्य परिवार मध्ये ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी व्यायाम ,योग __ हास्य करून शरीर निरोगी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतात. राष्ट्रीय सण उत्सव, थोर नेत्यांची जयंती साजरी करतात.