छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेका निमित्त तब्बल ४२८० किमी सायकल प्रवास करणार मावळे

पुणे : छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या ३५० व्या राजाभिषेकाचे औचित्य साधून मावळ-मुळशीतील जिगरबाज मावळे “लेह(खारदूंगला पास) ते कन्याकुमारी” असा तब्बल ४२८० किलोमीटर १२ राज्य व ५४ शहरे सायकल प्रवास करणार आहेत.

सदर मोहीमेसाठी जयेश संजयनाना मुरकुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मोहीमेची सुरुवात आपल्या बाणेर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन, रुग्णवाहिका आणि सायकल पुजन करून करण्यात आली.

याप्रसंगी मोहिमेला जाणाऱ्या विनायकराव दारवटकर ,
किरण शेळके,हनुमंतराव जांभूळकर,विशाल डुंबरे,संदीप गोडांबे ,दत्ता म्हाळसकर या सायकलस्वारांचा कु.जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशनच्या तसेच बाणेर भागातील शिवभक्तांच्या वतीने सन्मान करण्यात आला. याकार्यक्रमास उद्योजक संजय मुरकुटे,महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रल्हाद सायकर ,माजी नगरसेवक अमोल बालवडकर , कोंढवे धावडेचे माजी उपसरपंच सुनित लिंबोरे,अतुल ब.धावडे ,नवनाथ धावडे ,मनसेचे अनिकेत मुरकुटे,संदीप कळमकर, विश्वास कळमकर, वसुंधरा अभियानाचे सदस्य व मावळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व प्रोत्साहन वाढवण्यासाठी स्थानिक शिवभक्त व राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

See also  काँग्रेसमध्ये स्वाभिमान गहाण ठेवलेल्या आणि भाजपात जाऊन स्वाभिमान विकलेल्या राणेंची किंमत चाराणें राहिली असल्याचे टीका शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली