‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी, बाणेर पाषाण लिंकरोड येथे श्री गणेशोत्सवा निमित्त आकर्षक सजावट, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पाषाण : बाणेर पाषाण लिंक रोड येथील ‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी मध्ये  श्री गणेशोत्सवा निमित्त सुंदर सजावट, विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.’मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी श्री गणेश उत्सवाचे यंदाचे  12 वे वर्ष आहे.

दहा दिवसांच्या श्री गणेश उत्सवात सकाळी आणि संध्याकाळी आरती करण्यात येते. सोसायटीतील सर्व वयोगटातील मुलांनी विविध  क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. 

सुंदर आकर्षक सजावट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी प्रांगणात श्री गणेशोत्सवाच्या आगमनाने  आनंदमयी आणि भक्तिमय वातावरण तयार झाले. सोसायटीतील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेल्या कला अविष्काराने या आनंद आणि भक्तिमय सोहळ्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. 

यावर्षी ‘मिडोज हॅबिटॅट’ सोसायटी श्री गणेश उत्सवात लहान मुले, सर्व वयोगटातील मुलांचा आणि ज्येष्ठ सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उत्सव प्रमुख गणेश तिखे, पुष्कर कुलकर्णी, विवेक तळेगावंकर चैतन्य फराटे यांनी उत्कृष्ट आयोजन केले आहे. रामदास कुलकर्णी, गिरीष पाठक, प्रसाद चौधरी, अभिजीत कळसकर, हनमंत बिरादार, दिलीप निंबळे, गौरी कुलकर्णी, गौरी तळेगावंकर, प्रज्ञा कळसकर यांचा श्री गणेश उत्सवात उल्लेखनीय सहभाग होता.

See also  चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार