औंध : औंध येथे अथर्वशीर्ष पठण 1001 चे नियोजन नेहरू तरुण मंडळ अमृतमोहोत्सव वर्ष निमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमास औंध आणि आजूबाजूच्या परिसरातील 1100 ते 1200 महिला उपस्थित होत्या. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी भारतमातेच्या रक्षणासाठी संकल्प करून महिलांनी अथर्वशीर्ष पठण सुरू केले. 21 आवर्तने फलश्रुती झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिववंदना घेण्यात आली. त्यानंतर श्रींची महाआरती उपस्थित सर्व महिलांच्या आणि लहान मुलींच्या हस्ते करण्यात आली. दोन हजार गणेशभक्त महिला भाविक भक्तांसाठी महाप्रसाद भोजन व्यवस्था करण्यात आली.
यावेळी नेहरू तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.