औंध शिवाजीनगर सांस्कृतिक महोत्सव प्रस्तुत रास गरबा दांडिया जल्लोषात संपन्न

औंध : औंध शिवाजीनगर सांस्कृतिक महोत्सव प्रस्तुत रास गरबा दांडिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेत्री मानसी नाईक यांच्या नृत्याने नागरिकांना थिरकत ठेवून उत्साह व जल्लोषात संपन्न झाला.
ॲड डॉ. मधुकर मुसळे व नगरसेविका सौ अर्चना मुसळे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर अभिनेत्री मानसी नाईक यांनी नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत सर्व उपस्थितांना दोन तास नृत्यावर थिरकत ठेवल.

चंद्रशेखर बावन्नकुळे म्हणाले, नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर आपण काम करून त्याची परतफेड केली पाहिजे , ते आपलं कर्तव्य आहे नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी हे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडल व पाहून भाग स्मार्ट करून दाखवला.

तर नागरिकांनी निवडून दिल्यावर पाच वर्षांपैकी दोन वर्षे कोरोना मध्ये गेले परंतु उर्वरित तीन वर्षांमध्ये आम्ही नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या माध्यमातून औंधचा कायापालट करून दाखविला. औंध भागात उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून स्मार्ट बनवलं.
आता सांस्कृतिक क्रीडा, कला व शैक्षणिक क्षेत्रातही आम्ही औंधला उच्च स्थानावर नेऊन ठेवणार आहोत आणि त्याचाच भाग म्हणून रास गरबा दांडियाचे आयोजन केलं असे ॲड डॉ मधुकर मुसळे यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड डॉ मधुकर मुसळे, मा. नगरसेविका सौ अर्चना मधुकर मुसळे, पुणे भाजपा शहराध्यक्ष श्री धीरज घाटे ,माजी मंत्री श्री दिलीप कांबळे माजी नगरसेवक श्री सुशील मेंगडे, मा. भाजप पुणे शहर युवा अध्यक्ष श्री राघवेंद्र मानकर, मयूर मुंढे , पुष्पराज पटेल , अनिल सैनी , शिवम महाबरे , प्रशांत शितूत, स्वाती वितोंडे , माधवी पानसरे , सुहास पानसरे व्यंकट पिल्ले रवींद्र साळू, माधवी देसाई , श्री जमदग्नी , पै.विकास रानवडे शेषारामजी चौधरी , दिलीप देशमुख , संकेत व स्वप्नील सांगळे , मिलिंद कदम अक्षय सांगळे , अनुप मुसळे उपस्थित होते.

See also  जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन