शिवराय मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या गणपतीचे आकर्षक रथात मिरवणूक काढून उत्साहात विसर्जन

सुतारवाडी : शिवराय मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट,सुतारवाडी गावठाण मंडळाची स्थापना १९८६ मध्ये गावातील तरुणांनी एकत्र येऊन केली. सालाबादप्रमाणे मंडळाने मोठ्या दिमाखात ३८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले मंडळाने उत्सवाला सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाची जोड दिली आहे पुर्वी पौराणिक कथा सामाजिक संदेश देणारे देखावे ही खासियत असणारे मंडळ तसेच देशभक्ती आणि अध्या्मिक सांगड घालून आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा केला.

तसेच मंडळाने महिला भजन आणि खास महिलांसाठी स्पेशल आकर्षण असणारे होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा विविध मनोरंजक खेळाच्या स्पर्धाचा कार्यक्रम घेण्यात आले‌. भव्य दिव्य सुतारवाडीचा राजा विसर्जन मिरवणूक आकर्षक रथामध्ये विराजमान होऊन राजाची विसर्जन मिरवणुक सुरु झाली.दरवर्षी काहीतरी वेगळा देखावा सादर करण्याचा प्रयत्न मंडळाचा असतो त्याप्रमाणे या वर्षी भव्य दिव्य रथ सजवला होता रथाने संपूर्ण सुतारवाडी करांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे आवाज मुळशी पथक ,भैरवनाथ तरूण मंडळ वारू मावळ झांज पथक आणि भैरवनाथ तरूण मंडळ ढोल झांज पथक खेळ बेडसे मावळ* या पथकांनी उत्कृष्ट वादन केले.अतिशय उत्साहपुर्ण व भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिवणूक पार पडली. सुतारवाडी तसेच पाषाण आणि अजू बाजूंच्या गावा मधून आलेल्या सर्व गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला. सर्व मंडळाचे पदाधिकारी ,सभासद,वर्गणीदार , लहान , थोर , ज्येष्ठ, महिला भगिनी यांचे विशेष आभार मानले
गोविंदतात्या रणपिसे ,दिलीप रणपिसे , मधुकर रणपिसे शामदादा रणपिसे , सचिन रणपिसे ,अतुल रणपिसे ,रोहित रणपिसे , कैलास रणपिसे,अमित रणपिसे , विवेक रणपिसे प्रसाद गलांडे अक्षय रणपिसे प्रमोद रणपिसे योगेश रणपिसे नवनाथ रणपिसे विजय रणपिसे शशांक रणपिसे आदी उपस्थित होते.

See also  पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव- राज्यपाल रमेश बैस