महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय -रोहित पवार

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना रात्री बारा वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसमध्ये बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यातच राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टाकडून रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘बारामती ॲग्रॉ’ च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल सर्वप्रथम हाय कोर्टाचे आभार मानतो. तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं, त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल. पण यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय. एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत रोहित पवारांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.

दरम्यान, येत्या ६ ऑक्टोंबरला बारामती अॅग्रोबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत बारामती अॅग्रोबाबत कोणतीही कारवाई करू नका, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला देण्यात आले आहेत. त्यामुळे रोहित पवारांना कोर्टाकडून तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. यातच आता ६ ऑक्टोबरच्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बारामती ॲग्रॉ’ च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मा. हाय कोर्टाचे आभार मानतो… तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल असे रोहित पवार यांनी सांगितले.

See also  सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय बैठक कोथरूड येथे संपन्न