पुणे लोकसभा मतदार संघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठकीचे आयोजन

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून मराठा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी पुणे शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार 26 मार्च 2024 रोजी श्री खंडूजीबाबा मंदिर डेक्कन,शिवाजीनगर येथे बैठकीचे आयोजन सायंकाळी ६ वा. करण्यात आले आहे.

पुणे शहरातील मराठा समाजाच्या माध्यमातून निवडणूक लढवून मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी शेकडोच्या संख्येने अर्ज भरण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर जालना येथे मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीनंतर मराठा समाज पुणे शहरात लोकसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवणार असून शहरांमध्ये मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यात येणार असल्याने या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील सर्व मराठा बांधवांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय मराठा बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहून मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यासंदर्भात होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  पाषाण येथील शिवनगर, विठ्ठल नगर, लमाण वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ