बेडगगाव ते मुंबई लॉंग मार्च पुण्यामध्ये दाखल

पुणे : बेडगगाव, तालुका मिरज, सांगली येथे १६ जुन २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच जमीनदोस्त करण्यात आले. ह्या अनुषंगाने आंबेडकरी अनुयायी महिला , लहान मुले वृद्ध तरुण सर्व मागासवर्गीय गाव सोडून मुंबई मंत्रालयाकडे लॉन्ग मार्च निघाला आहे. हा लॉंग मार्च पुण्यामध्ये दाखल झाला.

पुणे पिंपरी चिंचवड येथील सर्व संघटना , सर्व राजकीय पदाधिकारी भेट घेऊन राहण्याची जेवण्याची सोय केली. वैद्यकीय सेवा दिली. दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना चे रोहन कांबळे , आर पी आय (A) चे बाळासाहेब पवार सचिन खरात , कैलास जोगदंड, भीम योद्धा चे साकी गायकवाड , गौतम सोनावणे , समता सैनिक दलचे मनोज गरबडे , दलित कोब्रा गटचे विवेक चव्हाण तसेच भाजप आ जा. मोर्चा चे कोथरूड विधानसभा सरचिटणीस प्रमोद कांबळे यांनी डॉ. महेश कांबळे यांनी आंदोलन कर्ते यांची भेट घेतली.

हा एक सामाजिक संघर्ष आहे , विषमता कधी मनातून निघणार , का आपण सारे भारतीय फक्त कागदावरच . का महामानव बाबासाहेब , छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचे स्मारक , फलक, प्रेरणा देणारे नको आहेत काही मानसिकतेला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमानी साठी शासनाकडून त्वरित निधी वर्ग करावा व 2023 मधेच बांधकाम पूर्ण करावे तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन