बाणेर पॅन कार्ड क्लब परिसरातील साहित्याची होतीय चोरी

बाणेर : पॅन कार्ड क्लब कायदेशीर प्रक्रियेमुळे बंद असताना या परिसरात मध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पॅन कार्ड क्लब परिसरातील गावठाणा जवळील भागामध्ये लोखंड व भंगाराचे राजरोजपणे विक्री होत असल्याची बाब नागरिकांनी सांगितली.

तसेच पॅन कार्ड परिसरातील महावितरण च्या साहित्याचे देखील भंगार मध्ये विक्री होत असल्याचे काही सजग नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. तसेच पॅन कार्ड च्या सुरक्षा भिंतीचे पत्रे देखील काढण्यात आल्यास याची भंगार मध्ये होत असलेली विक्री यामुळे या परिसरात भविष्यात अतिक्रमणे वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

पॅन कार्ड क्लब ची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने या परिसरात सुरक्षा रक्षक नाही. याचाच गैरफायदा घेतला जात असल्याने या परिसरात अनेक प्रकारचे गैरप्रकार देखील वाढत आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून याबाबत पोलीस व शासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर'पीएमश्री' योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता