पुणे शहरातील शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी अल्पकालीन उपाय, बिग डेटा वापर, स्वच्छ हवा व TOD आधारित सर्वसमावेशक धोरणावर भर

पुणे : पुणे शहरातील Urban Mobility (शहरी गतिशीलता) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. ही कार्यशाळा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेला मा.महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपुरे, मा.उपमहापौर श्री.परशुराम वाडेकर, मा. सभागृह नेते श्री गणेश बिडकर तसेच मा. विरोधी पक्षनेते श्री निलेश निकम यांनी उपस्थिती दर्शवून आपले मौलिक मनोगत व्यक्त केले. त्यांनी येत्या काळात पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असा आग्रह धरला.

मा.महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,“पुणे शहर कोंडीमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. अल्पकालीन, तात्काळ करता येणाऱ्या उपायांवर भर देत नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर चालत पाहणी करून समस्या नोंदविणारे ‘जागल्या’ नेमण्यासारख्या उपक्रमांतून प्रशासन अधिक गतिमानपणे काम करेल.”

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री नवल किशोर राम यांनी सांगितले की,सन २०२६ साठी रस्ते विकास व वाहतूक सुधारणा यासाठी पुणे महानगरपालिका इतर शासकीय विभागांसोबत समन्वयाने काम करणार आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी वाहतुकीशी संबंधित बिग डेटा (Big Data) चा वापर करून ट्रॅफिक पॅटर्न, गर्दीची ठिकाणे आणि समस्या ओळखून उपाययोजना केल्या जातील. तसेच भविष्यातील भांडवली खर्चिक (capital intensive) प्रकल्प रणनीतीपूर्वक व दीर्घकालीन दृष्टीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यशाळेत मा.शहर अभियंता श्री अनिरुद्ध पावसकर यांनी येत्या वर्षात व पुढील काळात पुण्यातील वाहतूक परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच मा.मुख्य अभियंता श्री. राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्री दिनकर गोजारे यांनी एका वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांची माहिती दिली.

See also  शिवकालीन युद्ध कला दानपट्टा सादरीकरणाने 'शिवतीर्थ फाऊंडेशन'ची छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कार्यशाळेत मा.शहर अभियंता श्री अनिरुद्ध पावसकर यांनी येत्या वर्षात व पुढील काळात पुण्यातील वाहतूक परिस्थिती सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच मा.मुख्य अभियंता श्री. राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्री दिनकर गोजारे यांनी एका वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपयोजनांची माहिती दिली.यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त श्री मनोज पाटील यांनी वाहतूक शिस्त, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आयआयटीएम (IITM) संस्थेच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (Air Quality) महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.

कार्यशाळेमध्ये स्वच्छ हवा (Clean Air) या विषयाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर वाढविल्यास उत्सर्जन व प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते, यावर सखोल चर्चा झाली. यासोबतच पुणे शहरात जे. एम. रोड, एफ. सी. रोड यांसारखे अधिक रस्ते पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक जीवनासाठी अनुकूल ‘स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दुपारच्या सत्रामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांनी शहरी वाहतूक व्यवस्थेतील सर्वोत्तम पद्धती मांडल्या. CRRI, Oasis Designs, Design Point (अहमदाबाद) तसेच RKD संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांबाबत आपले अनुभव सादर केले.

याच सत्रामध्ये NIUA, नवी दिल्ली या संस्थेमार्फत UrbanShift उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेसोबत Transit Oriented Development (TOD) संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. TOD साठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे, स्टेशन एरिया प्लॅन तयार करणे आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात पायलट प्रकल्प राबविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

याच अनुषंगाने वाहतूक नियोजक श्री निखिल मिजार यांनी TOD विषयावर पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांसोबत संवाद साधला. या चर्चेमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरातील विकास व विशेषतः पुनर्विकास (Redevelopment) या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या संवादात CREDAI, MBVA, NAREDCO, AESA तसेच IIA या संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते.

या कार्यशाळेदरम्यान विविध हितधारकांनी मांडलेल्या सूचना व कल्पना नोंदविण्यात आल्या असून त्या स्टेशन एरिया मोबिलिटी प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री दिनकर गोजरे आणि वाहतूक नियोजक श्री निखिल मिजार यांनी केले.

अशा स्वरूपाच्या कार्यशाळा प्रत्येक विभागाने नियमितपणे आयोजित कराव्यात तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन येणाऱ्या वर्षात महापालिकेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

See also  विघ्नहर्ता नागरी सह पतसंस्था आणि मॉर्निंग ग्रूप पाषाण यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता १० आणि १२ च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन

यावेळी पोलीस अतिरिक्त आयुक्त श्री मनोज पाटील यांनी वाहतूक शिस्त, अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आयआयटीएम (IITM) संस्थेच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत (Air Quality) महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.

कार्यशाळेमध्ये स्वच्छ हवा (Clean Air) या विषयाचे विशेष महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक, बस व मेट्रोचा वापर वाढविल्यास उत्सर्जन व प्रदूषणात लक्षणीय घट होऊ शकते, यावर सखोल चर्चा झाली. यासोबतच पुणे शहरात जे. एम. रोड, एफ. सी. रोड यांसारखे अधिक रस्ते पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक जीवनासाठी अनुकूल ‘स्ट्रीट्स’ म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

दुपारच्या सत्रामध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या तज्ज्ञांनी शहरी वाहतूक व्यवस्थेतील सर्वोत्तम पद्धती मांडल्या. CRRI, Oasis Designs, Design Point (अहमदाबाद) तसेच RKD संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणीयोग्य उपाययोजनांबाबत आपले अनुभव सादर केले. याच सत्रामध्ये NIUA, नवी दिल्ली या संस्थेमार्फत UrbanShift उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेसोबत Transit Oriented Development (TOD) संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यात आली. TOD साठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे, स्टेशन एरिया प्लॅन तयार करणे आणि शिवाजीनगर मेट्रो स्टेशन परिसरात पायलट प्रकल्प राबविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

याच अनुषंगाने वाहतूक नियोजक श्री निखिल मिजार यांनी TOD विषयावर पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारदांसोबत संवाद साधला. या चर्चेमध्ये मेट्रो स्टेशनच्या परिसरातील विकास व विशेषतः पुनर्विकास (Redevelopment) या विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या संवादात CREDAI, MBVA, NAREDCO, AESA तसेच IIA या संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते.या कार्यशाळेदरम्यान विविध हितधारकांनी मांडलेल्या सूचना व कल्पना नोंदविण्यात आल्या असून त्या स्टेशन एरिया मोबिलिटी प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री दिनकर गोजरे आणि वाहतूक नियोजक श्री निखिल मिजार यांनी केले.

अशा स्वरूपाच्या कार्यशाळा प्रत्येक विभागाने नियमितपणे आयोजित कराव्यात तसेच पुणे महानगरपालिकेतील सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन येणाऱ्या वर्षात महापालिकेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.