कोथरूड : शिवकल्याण मित्र मंडळ , रा. जिजाऊ नगर (सुतारदरा), कोथरुड,पुणे या मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे मंडळाच्या श्रींच्या विसर्जन च्या वेळी मिरवणुकीत डी.जे न लावता, श्रींची पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात डीजे च्या आवाजा मूळे अनेकांना जीव गमवण्याच्या घटना घडल्या आहेत. आणि लेजर लाइट मुळे अनेकांना दृष्टी गमवावी लागली आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली डीजे लाऊन कर्कश आवाज आणि तरुण मुलांचे गणपती समोरच वेडेवाकडे नाचने असे प्रकार बघायला मिळाले. असे करुण आपली संस्कृती चुकीच्या मार्गाला चालली आहे असे लक्षात येते.
मंडळाचे संस्थापक सचिन मार्कंडे यांनी सांगितले की,हा घेतलेला निर्णय आपली संकृती टिकावी आणि आपल्या पुढच्या पिढीला आपली खरी संस्कृती कळावी हाच आमच्या मंडळाचा एक छोटासा प्रयत्न आहे.आपण समाजाचे काही तरी देण लागतो असा विचार करुण इथून पुढे गणेशोत्सवाचे दहा दिवस अनेक समाजोपयोगी ( तरुणांसाठी नोकरी मोहोत्चव , आरोग्य शिबिर , डोळे चिकित्सा, ) असे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेणार आहोत.