आम आदमी पार्टीच्या अनुसूचित जाती (SC) शहराध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची निवड

पुणे :आम आदमी पार्टीच्या अनुसूचित जाती पुणे शहर अध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रशांत कांबळे म्हणाले, राष्ट्रीय प्रमुख अरविंद जी केजरीवाल, महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटक मंत्री अजित फाटके, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी माझी निवड केली, माझ्यावरती जो पक्षाने विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची मी ग्वाही देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न मी नेहमी करत आलोय करणार आहे, सर्वांना समभावाची भावना देऊन सर्वांचा आदर करून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देऊन मी पुढे जाणार आहे, त्याचबरोबर माझ्या समाजावर कुठेही अन्याय झाला नक्कीच समाजाच्या पाठीशी उभा राहणार आहे, अर्थातच सर्वांची साथ ही मोलाची असणार आहे, माझा समाजावरती आजही अन्याय होतो ही खेदाची गोष्ट आहे, देशाला 76 वर्ष स्वातंत्र्य मिळून देखील आजही जातीपातीचे राजकारण चालत आलेला आहे, हे कुठेतरी संपलं पाहिजे या भावनेतून पुढील वाटचाल माझी असणार आहे.

See also  शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे करणार मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश