एन एस यु आय चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे वेळोवेळी मेसच्या जेवणामध्ये झुरळ आळ्या आढळून आल्या आहेत यासाठी अनेक वेळा पाठवपुरवा करून देखील यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन निर्णय घेत नव्हते म्हणुन आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली NSUI पुणे तसेच समविचारी संघटना सोबत विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केले व या मेस कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून घेतले व विद्यार्थ्यांना स्वच्छ व पोषक जेवण उपल्ब्ध करुन देण्यासाठी कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली.

यावेळी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाट व युवक व क्रीडा अध्यक्ष आशुतोष शिंदे तसेच विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे तसेच NSUI चे आक्रमक नेते आकाश कांबळे, कृष्णा साठे हे सर्व उपस्थिती होते .

See also  गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात वार्षिक क्रिडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न