पुणे शहर जिल्हा इंटक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चेतन आगरवाल

पुणे – काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चेतन सुरेश आगरवाल यांची पुणे शहर जिल्हा इंटकच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी नियुक्तीचे पत्र चेतन आगरवाल यांना सुपूर्द केले.

चेतन आगरवाल कॉंग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाच्या माध्यमातून ब्लॉक सरचिटणीस, युवक काँग्रेस सरचिटणीस, शहर काँग्रेस सरचिटणीस यासह पुणे जिल्हा विद्युत मंडळ समन्वय समिती तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती (महाराष्ट्र शासन) अशा विवीध पदांवर काम केले आहे. क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

चेतन आगरवाल यांचे वडील कै.सुरेश आगरवाल हे सुद्धा विद्युत मंडळामधे इंटक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. घरामधून कामगार क्षेत्राचा अनुभव मला मिळाला त्याचा उपयोग मी इंटक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत करीन, असे चेतन आगरवाल यांनी सांगितले.

भाजप सरकारने कामगारांसाठी जुलमी कायदे केले आहेत त्या विरोधात कामगारांना न्याय मिळेपर्यंत लढत रहाणार आहे, अशी प्रतिक्रिया चेतन आगरवाल यांनी दिली.

See also  मॉर्डन महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी