“म.न.पा. कंत्राटी कामगारांना कधी मिळणार वेळेवर वेतन” — कामगारन नेते मा. सुनिल शिंदे

पुणे : पुणे म.न.पा. मध्ये सुमारे १० हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये काम करीत आहेत.या कर्मचाऱ्यांचा पगार कधीच वेळेवर होत नाही.किंबहुना आजपर्यंत कधीही वेळेवर झालेला नाही,या कर्मचाऱ्यांना पगार स्लिप मिळणे कायद्याने बंधनकारक आहे परंतु एकही कंत्राटदार पगार स्लिप देत नाही. प्राव्हिडंट फंडाची रक्कमही वेळेवर व कायदेशीर भरणा केला जात नाही.कामगार राज्य विमा महामंडळात (इ. एस. आय.सी .) मध्ये सर्व कंत्राटी कामगारांची नोंदणी करून त्यांना ई-पहचान कार्ड कायद्याने देणे बंधनकारक आहे.परंतु त्याचीही पूर्तता आजपर्यंत कंत्राटदारांकडून झालेली नाही.

विनाकारण अनेकदा पगार कापला जातो.त्याचे कारणही सांगितले जात नाही.अनेक कंत्राटदार किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन देत आहेत या सर्व बाबींकडे येथील संबंधित अधिकारी हेतूपुरस्सर डोळेझाक करीत आहेत अनेक कंत्राटदारांची अशी प्रकरणे आमच्या संघटनेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडे उघडकीस आणली गेली आहेत परंतु अशा एकाही कंत्राटदारावर कारवाई झाल्याचे समोर आले नाही.अनेक कंत्राटदार दोन-दोन महिने पगार उशिरा करत आहेत. या सर्व संदर्भामध्ये मी.न.पा. मधील कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर प्रश्नांसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे आश्वासन देण्यात आलेले होते त्याची अंमलबजावणी अजून पर्यंत झालेली नाही.याबाबत मी.न.पा. प्रशासनाने त्वरित पावले उचलून कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करावे अशी मागणी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांनी म.न.पा.प्रशासनाकडे केली आहे.

See also  प्रजासत्ताक दिनी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे ध्वजवंदन