कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे!आदेश मागे जनतेमधील रोषाचा परिणाम : आम आदमी पार्टी

पुणे : फडणवीस शिंदे पवार सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला आहे*. हा हजारोंनी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचे यश आहे. आज पुण्यात नवी पेठ येथे आप तर्फे मिठाई वाटून आदेश मागे घेतला गेल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला. सरळ सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आप चे ही आभार मानले.

हा कंत्राटी भरतीचा आदेश गुणवत्ता नाकारणारा आणि आरक्षणाची संधी नाकारणारा असल्याने त्याला आम आदमी पार्टीचा सुरवातीपासून विरोध होता. सरकारी नोकरी ही सामाजिक प्रतिष्ठा आणि सुरक्षा देते. परंतु ही अपेक्षा नाकारत हा आदेश म्हणजे कंत्राटदारांना ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरणार होती. त्याशिवाय या कंत्राटी भरतीमुळे उत्तरदायित्वाचा प्रश्न निर्माण होणार होता. *आम आदमी पार्टीने या विरोधामध्ये पुण्यात व इतरत्र आंदोलन तसेच विविध संघटनांसोबत निदर्शनात सहभाग घेतला होता*. तसेच सह्यांची मोहीम राबवली.

आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाब मध्ये कंत्राटी भरती रद्द करून कायमची भरती करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही सरकारने असे स्पष्ट धोरण अवलंबण्याची गरज आहे अशी अपेक्षा आपचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी असताना या पद्धतीने आदेश मागे घेण्याची वेळ आल्यावर ‘ गिरे तो भी टांग उपर ‘ असे पत्रकार परिषदेत फडणवीस यांचे बोलणे होते.कंत्राटी भरती हे दुसऱ्या कुणाचे पाप आहे अशा पद्धतीची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. परंतु ‘ कंत्राटी भरती ‘ हे पाप आहे हे मान्य केले त्याबद्दल त्यांचे कौतुकच असा टोमणा मुकुंद किर्दत यांनी मारला.


यावेळेस आप चे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अक्षय शिंदे, अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निरंजन अडागळे , अमोल मोरे , किरण कांबळे, शंकर थोरात, सुरज सोनावणे , वैभव कांबळे, उमेश बागडे, सय्यद अली, रितेश निकाळजे , दत्तात्रय भांगे गणेश ससाने, अभय पाटील, शिवराम ठोंबरे कीर्तीसिंग चौधरी, प्रशांत कांबळे , सागर पवार , शेखर ढगे, अजिंक्य जगदाळे ,प्रदीप उदगे नआदी उपस्थित होते.

See also  कार्यसम्राट माजी आमदार स्व.विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य शिबिर, पुर्व तपासणी शिबीरात ६० हजार रुग्णांची तपासणी.