माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने रास दांडिया महोत्सवचे आयोजन

सुतारवाडी : माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्यावतीने नवरात्रोत्सव निमित्त तरुण,तरुणी, महिला भगिनी यांसाठी रास दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. हा रास दांडिया महोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. सुतारवाडी, पाषाण, सुस रोड परिसर आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनसोक्त दांडिया रास खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये थेट संगीत, दांडिया रास, लाईट शो यासह सुरक्षित वातावरणाची खात्री अशा अनोख्या संस्कृतीचा संगम नागरिकांना अनुभवायला मिळाला.

या दांडिया महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्यनगरीचे माजी महापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, युवासेना सचिव किरण साळी, पाषाणचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण, आबा सुतार, शिवम सुतार, लहू बालवडकर, अजय निम्हण, किरण निम्हण, सचिन दळवी, अक्षय पिसाळ, सिने – अभिनेत्री गायत्री बनसोडे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यावेळी उपस्थित सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार यांनी मानले.

See also  स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा भाजपात प्रवेश