वरुडे पाटील यांना नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सवात पुरस्काराने सन्मानित

पुणे :-नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव, गणेश क्रीडा कला मंच पुणे येथील कार्यक्रमात श्री.विठ्ठलराव वरुडे पाटील यांना समाजसेवेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नवरात्रौ उत्सव मागील 29 वर्षापासून मोठ्या उत्साहात अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत असतो.


आपल्या कार्याने समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून गरजूंचा आधारवढ बनणाऱ्या व्यक्तींना मा.संस्थापक अध्यक्ष-आबा बागुल, मा.सौ जयश्रीताई बागुल, कोषाध्यक्ष मा.श्री.नंदकुमार बानगुडे फिनोलेक्स पाईप व मुकुंद माधव फाउंडेशनचे मॅनेजर मा.श्री सचिन कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
माय माऊली केअर सेंटर यासह विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवेचा सन्मान व सामाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून विठ्ठलराव वरूडे पाटील यांना सन्मान चिन्ह, श्री महालक्ष्मी फोटो फ्रेम व शाल देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव संस्थापक अध्यक्ष मा.श्री.आबा बागुल माननीय सौ जयश्रीताई बागुल व सर्व पुणे नवरात्रौ महोत्सव चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना वरुडे पाटील यांनी सांगितले की, अशा पुरस्कारामुळेच सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी गती आणि प्रेरणा मिळत असते. यामुळे सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे. यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त व सचोटीने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. हा पुरस्कार ज्या ज्येष्ठ व वृद्धाच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत असून पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानतो

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट