कर्वेनगर परिसरामध्ये मराठा समाजाचा कॅन्डल मार्च

कर्वेनगर : हिंगणे ब्रु. ( कर्वेनगर ) मधुन मराठा आरक्षण मिळण्यासाठी कॅन्डल मार्च करण्यात आले तसेच मनोज जरांगे पाटील यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला.

राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. हिंगणे बुद्रुक कर्वेनगर येथे मराठा समाजाच्या वतीने कॅन्डलमार्च काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव यात सहभागी झाले होते.

शासनाने मराठा आरक्षण प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

See also  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  जनतेच्या हिताचे अनेक निर्णय  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे