सुसगाव परिसरात मराठा समाजाने केले रास्ता रोको आंदोलन

सुसगाव : मराठा आरक्षण व मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सुसगाव परिसरातील मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाबाबत शासन गंभीर नसल्याने तसेच मराठा आरक्षणावर योग्य तोडगा असल्याने मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने सुरू असून या आंदोलनाला उग्र स्वरूप मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सुसगाव परिसरामध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने आक्रमक आंदोलन करत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी टायर पेटवून देत रास्ता रोको केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा अशी मागणी आंदोलन करत होते.

See also  सहाय्यक आयुक्तांनी खड्ड्याची दखल घेतल्यानंतर आठ दिवसांनी सुरक्षेसाठी नागरिकांना उभा करावा लागला टायर