पाषाण मध्ये भाजपाच्यावतीने लहान व्यावसायिकांसाठी दिवाळी प्रदर्शनाचे आयोजन

पाषाण : महाराष्ट्र प्रदेशाचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजपा उत्तर कोथरूड मंडळ तर्फे लहान व्यवसायांना मोठी चालना देण्यासाठी नूतन दिवाळी प्रदर्शन अणि विक्री उपक्रम आयोजित करण्यात आला होता.


महिला उद्योजकांना वाव मिळावा म्हणुन स्टॉल मोफत देण्यात आले होते. बर्‍याच महिलानी पहिल्यांदा अश्या प्रदर्शनात भाग घेतला होता तर कोविड नंतर थांबलेल्या व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळावी म्हणून बऱ्याचजणी भाग घेत होत्या. एकूण १०० पेक्षा जास्त स्टॉल धारक होते. सर्वांसाठी अल्पोपाहार अणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती.
मा ना.श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिप प्रज्वलन केलं तसेच भाजप चे सर्व उच्च पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे संयोजक उत्तर कोथरूड भा ज प अध्यक्ष श्री सचिन पाषाणकर, मंडल सर चिटणीस सौ उमाताई गाडगीळ, महिला मोर्चा अध्यक्षा सौ अस्मिताताई करंदीकर अणि मंडळ सदस्य सौ योगिताताई कोकाटे व भारतीताई पाषाणकर होत्या.

See also  मोहिते पाटलांच्या " बलराज " अश्वाचे देहूकडे प्रस्थान
आज जगतगुरुंच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान